प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - ओळख मित्र कीटकांची

News
चला ओळख करून घेऊया मित्र कीटकांची. मित्र कीटक जे शेतीमधील हानिकारक किडींना खाऊन किंवा त्यांच्यावर परजीवी म्हणून जगून पिकांचे संरक्षण करतात

Crop Name : OTHER ||
Work Purpose : Crop Protection ||


चला ओळख करून घेऊया मित्र कीटकांची.   मित्र कीटक जे शेतीमधील हानिकारक किडींना खाऊन किंवा त्यांच्यावर परजीवी म्हणून जगून पिकांचे संरक्षण करतात.


1.

क्रायसोपा

या कीटकाची अळी अवस्था मावापांढरी माशीतुडतुडेलाल कोळीनागअळीफुलकिडेपिठ्या ढेकुणखवले कीड यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, लहान अळ्या खातात.
2.

Blue bottle fly

या माश्या परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः आंब्याच्या फुलांवर परागीभवनासाठी ह्या माश्या जास्त प्रमाणात दिसतात. या फुलांवर असलेल्या परागकणांना हलवून परागीभवन घडवून आणण्यात त्यांचे महत्त्व आहे.
3.

इलियस सिँक्टा

भुरीचे बीजाणू खाऊन नियंत्रण करणारा मित्रकीटक ढाल किडीची प्रजाती
4.

ट्रान्सव्हर्स लेडीबर्ड

उपयुक्त परभक्षी कीटक असून ती विविध प्रकारच्या मावामिली बगपांढरी माशी या किडीवर खाते.
5.

ढाल किटक

या मित्रकिडीच्या अळ्या व प्रौढ प्रामुख्याने मावातुडतुडे आणि पांढऱ्या माशीचे अंडी व पिल्ले खातो.
6.

ड्रॅगनफ्लाय

ड्रॅगनफ्लाय (चतुर) आंबा पिकावरील फळमाशी, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी आणि हॉपर्स यांसारख्या उडणाऱ्या किडींचे नैसर्गिक नियंत्रण करतो.
7.

लाँग-लेग्ड फ्लाय

मावा, तुडतुडे, मिज माशी इत्यादी हानिकारक कीटक खाऊन त्यांचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करतात.
8.

मेक्सिकन भुंगा

हा भुंगा आणि त्याच्या अळ्या गाजर गवताच्या पानांवर व फुलावर मोठ्या प्रमाणावर खातात, त्यामुळे गवताची वाढ आटोक्यात येते.
9.

प्रार्थना कीटक

हा कीटक शेतीमध्ये हानिकारक कीटक नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो कारण तो इतर कीटकांचा शिकार करतो. त्यामुळे तो जैविक कीड नियंत्रणात महत्त्वाचा मानला जातो.
10.


फुलेरी मधमाशी

ही मधमाशी शेती आणि पर्यावरणासाठी उपयुक्त असून नैसर्गिक परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
**************

प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे
(कृषि कीटकशास्त्रज्ञ) 
अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या.
**************