क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग)
क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग) याचे शास्त्रीय नाव क्रायसोपेर्ला कारनी या मित्र किडीचे प्रौढ हे परागकण आणि मावा पासुन मिळणारे हनीड्यू ( गोड पदार्थ) खातात आणि ते शिकारी नसतात, परंतु अळ्या वेगवेगळ्या कुळातील सत्तर पेक्षा जास्त किडींना खातात. सर्वात जास्तं मुख्यतः हेमिप्टेरा , लेपिडोप्टेरा या कुळातील आहेत या कीटकाची अळी अवस्था मावा, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी, नागअळी, फुलकिडे, पिठ्या ढेकुण, खवले कीड यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, लहान अळ्या खातात. हे मित्र कीटक कापूस, मका,कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. या मित्रकिडीची अळी तिच्या पाठीवर तिने खाल्लेला शत्रू कीटकांची मृत शरीर घेऊन फिरते कारण ती अळी ओळखूच येऊ नये म्हणून. दुसरे म्हणजे या हिरवा जाळीदार पतंग त्याच्या पंखातील ज्या शिरा आहेत त्या वटवाघुळांचा आवाज ओळखतात. वटवाघुळ हा या किडीची शिकार करतो म्हणून. ही किड दिसल्यास कॉपर नावाचं बुरशीनाशकांचा वापर करू नये या किडीचा ते खूप हानिकारक आहे.
प्रसार : ५,००० अंडी सोडावीत.

**************
प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे (कृषि कीटकशास्त्रज्ञ) यांचे इतर लेख अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या. **************
|