प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : फुलेरी मधमाशी

Knowledgebase
फुलेरी मधमाशी - नैसर्गिक परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावते.

Crop Name : OTHER ||
Work Purpose : Other ||


फुलेरी मधमाशी (Apis florea) हिला लहान मधमाशी किंवा फुलेरी मधमाशी म्हणतात.
ही मधमाशी शेती आणि पर्यावरणासाठी उपयुक्त असून नैसर्गिक परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
ती विशेषतः फळझाडे आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनवाढीस मदत करते, त्यामुळे कृषी क्षेत्रात तिचे महत्त्व लक्षणीय आहे.


मधमाशीचे महत्व -

  1. मधमाशीच्या डंखमध्ये मेलिटीन नावाचे द्रव्य मिळते ते स्तनाचा कॅन्सरवर खूप उपयोग आहे.
  2. मधमाश्या अनेक पिकांमध्ये परागीभवन करण्याचे काम करतात, ज्यामुळे उत्पादन वाढते. बियाणे मोठे आणि मजबूत होतात तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण इ.वाढविण्याचे काम करतात.
  3. ८०% पिके क्रॉस परागीभवनावर अवलंबून असतात, उदा. कांदा, मोहरी, कापूस, सफरचंद,मुळा, काकडी, मोसंबी इत्यादी या पिकांमध्ये मधमाशाच्या परागीभवनामुळे उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
  4. मानवी आरोग्यासाठी प्रथिने, व्हिटॅमिन याचा मुख्य स्त्रोत असणाऱ्या रॉयलजेलीचे उत्पादन मानवी प्रजाती साठी एक उपकारच आहे.
  5. संधीवाताची चिकिस्या करण्यासाठी देखिल मधमाशीच्या डंखाचा वापर केला जातो.
  6. भरपूर नैसर्गिक मध मिळतो.
**************

प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे
(कृषि कीटकशास्त्रज्ञ) 
यांचे इतर लेख

अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या.
**************