गाजर गवत (Parthenium hysterophorus) हे एक अत्यंत आक्राळविक्राळ आणि विषारी तण असून ते प्रामुख्याने पावसाळ्यात जोमाने वाढते. त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले ओलावा, उष्ण तापमान आणि सूर्यप्रकाश हे सर्व घटक पावसाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.
याच काळात गाजर गवताची वाढ पाहून मेक्सिकन भुंगा अन्नाच्या शोधात त्या झाडावर उपजीविका भागवतो
जीवनक्रम -
हा भुंगा आणि त्याच्या अळ्या गाजर गवताच्या पानांवर व फुलावर मोठ्या प्रमाणावर खातात, त्यामुळे गवताची वाढ आटोक्यात येते.
उन्हाळ्यात, ज्या काळात गाजर गवत उपलब्ध नसते, त्या काळात हा भुंगा सुप्त (inactive) अवस्थेत राहत असतो. विशेष म्हणजे,या भुंग्याच्या अंडी,अळी व प्रौढ अवस्थांचे जीवनचक्र हे गाजर गवताच्या वाढीशी सुसंगत (synchronized) असते. त्यामुळे त्याचे नैसर्गिक जैव नियंत्रण अधिक परिणामकारक होते.