आयडियल कृषी वाणी 37
Knowledgebaseटोमॅटो पिकात आढळणारे मुख्य विषाणूजन्य रोग
टोमॅटो पिकात आढळणारे मुख्य विषाणूजन्य रोग 1. टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस (चुरडामुरडा रोग) -प्रसारक कीटक- पांढरी माशी (Whitefly) लक्षणे - * पाने लहान होऊन वाकडी व गुंडाळलेली दिसतात. * पानांची कडा व शिरा पिवळसर होतात; पानांचा चहा कपासारखा आकार येतो. * फुले गळून जातात, झाडाची वाढ खुंटते. * पानांचा पोत खडबडीत व रंग जांभळसर होतो. 2. ग्राउंडनट बड नेक्रोसिस व्हायरस (शेंडेमर रोग) -प्रसारक कीटक- फुलकिडे (Thrips) लक्षणे - * सुरुवातीला लक्षणे बुरशीजन्य करपा रोगासारखी दिसतात. * शेंड्यापासून रोगाची सुरुवात होते; लहान तांबूस, काळसर वर्तुळे, चट्टे दिसतात. * कोवळी पाने करपून काळी पडतात; झाडाचे सर्व भाग संक्रमित होतात. * झाडे अकाली करपून मरतात, फळधारणाच होत नाही. * फळे वेडीवाकडी होतात, डाग पडतात, आकर्षक रंग येत नाही. 3. कुकुंबर मोझॅक व्हायरस (CMV) -प्रसारक कीटक - मावा (Aphids) लक्षणे - * पानांवर हिरवे-पिवळे ठिपके, असमान हरितरोगी नमुने. * झाडाच्या फांद्यांचा आकार दोरीसारखा दिसतो. * टोमॅटोशिवाय इतर अनेक पिकांनाही लागण होते – त्यामुळे नियंत्रण कठीण. 4. टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस -प्रसारक कीटक - पांढरी माशी लक्षणे - * पानांवर अनियमित रंगाचे ठिपके. * दोन शिरांमधील भाग पिवळसर तर शिरा हिरव्या राहतात. * रोगाची तीव्रता वाढल्यास पाने सुकतात. 5. टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस -लक्षणे - * फळे कडक व पिकलेली न वाटणारी. * फळांवर पांढरे-हिरवे डाग; आवरण भाजल्यासारखे दिसते. * फळांचा नैसर्गिक रंग व आकार बिघडतो. विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन - 1. रोपवाटिका संरक्षण - * प्रतिकारक/सहनशील वाण निवडा. * मका सापळा पीक म्हणून प्लॉटच्या कडेने लावा. २. कीटक नियंत्रण (फवारणी) - प्रारंभिक टप्प्यात (२०० लिटर पाण्यात) * थायोमिथोक्सम 25% WG – 100 ग्रॅम- active metho 25 WG * डायमेथोएट 30% EC – 160 मिली * इमिडाक्लोप्रिड 70% WG – 40 ग्रॅम-(actiphate gold) नैसर्गिक उपाय - * निंबोळी अर्क 5% * अझाडीरेक्टिन (1500 ppm) – 30 मिली—(active neem - * बायोपेस्टीसाईड्स: व्हर्टिसिलीयम किंवा मेटारायझीम ३. पीक व्यवस्थापन - * रोगग्रस्त झाडे/फळे काढून जाळा. * माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. * फळ तोड झाल्यावर उरलेले झाडे वेळ वाया घालवू न देता नष्ट करा. महत्त्वाच्या टिप्स * पिकात कीड आल्यावर कीटकनाशकाचा उपयोग होतो, पण विषाणूवर औषध नाही. * फक्त कीड रोखल्यासच रोगाचा प्रसार थांबतो. * नियमित निरीक्षण, फेरपालट, स्वच्छता आणि रोपवाटिका व्यवस्थापन हेच यशस्वी पिकाचे रहस्य. मागील लेख -
********************* आयडियल फौंडेशन 18008330455, 9623121955 शेतीविषयक माहिती मिळण्याकरता खालील लिंक चा वापर करावा. https://www.facebook.com/share/p/16o9GU5mU8/ ********************* |