खरीप हंगामातील कडधान्य पिकांच्या लागवडीपूर्वीची संपूर्ण तयारी१. जमिनीची निवड व तयारी - - मध्यम ते भारी कसदार जमीन या सर्व कडधान्य पिकांसाठी उपयुक्त आहे.
- जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे, कारण पाण्याचा साठा मुळांजवळ झाला तर मुळे कुजण्याचा धोका असतो.
- जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असणे उपयुक्त.
- पूर्व हंगामातील काडीकचरा, तण इ. साफ करून एक खोल नांगरणी आणि त्यानंतर 2-3 कुळवाच्या फेर्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
2. योग्य जाती/वाणांची निवड (जिल्ह्यानुसार/हवामानानुसार) - - कृषी विद्यापीठे, कृषी विभाग किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडून शिफारस केलेले वाण निवडावेत.
- शक्यतो सुधारित किंवा संकरित वाण घ्यावेत जे कमी कालावधीत उत्पादन देतात, रोगप्रतिकारक असतात.
उदाहरण : - 1 | तूर | BSMR-736, BSMR-853, BSMR-175, BSMR-716 (गोदावरी), भीमा. | 2 | मुग | BM-4, BM-2002-2, VBN-3, AKM-8802, जधवाड मुग (संसर्गक्षम) | 3 | उडीद | (TAU-1, AKU-5, Pant U-19, LBG-752, TPU-4 (टेक्सास प्रुफ) | 4 | चवळी | C-152, GC-3, Pusa Komal, TVX-944, Phule Konkan – नवीन वाण |
3. बियाण्याची गुणवत्ता तपासणे - - उगवण शक्ती (Germination Test) - उगवण शक्ती 80% पेक्षा जास्त असलेली बियाणे निवडावीत.
- स्वच्छता आणि आरोग्य - बियाणे स्वच्छ, तजेलदार आणि बुरशी/किडीपासून मुक्त असावेत. पिवळी पडलेली, किटकने खाल्लेली किंवा तुटलेली बियाणे टाळावीत.
- प्रमाणित बियाणे वापरणे - IS (Indian Standard) किंवा Truthfully Labelled Seed (TLS) असा लेबल असलेलेच बियाणे घ्यावे. कृषी सेवा केंद्र, कृषी विभाग किंवा सहकारी संस्थांकडून बियाणे विकत घ्यावे. बियाणे खरेदीची पावती तुमचा हक्काचा पुरावा आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी बियाणे घेताना पावती घ्या आणि सुरक्षित ठेवा.
4. बीजप्रक्रिया - बियाण्यांची प्रक्रिया (Seed Treatment) (अ) रोग व बुरशीपासून संरक्षणासाठी बियाणे पेरणीपूर्वी खालीलपैकी बुरशीनाशक (Fungicide) ने प्रक्रिया करावीत * कार्बेन्डाझिम - 1-2 ग्रॅम/किलो बियाणे * थायरम - 2.5 ग्रॅम/किलो बियाणे (ब) जैविक बीजप्रक्रिया - लिफ्टर वॅम-3-4 ग्रॅम / किलो लिफ्टर पी-3-4 मिली / किलो ब) कीड नियंत्रणासाठी अक्टिव्ह मिथो प्रो (थायोमेथोक्झाम 30 FS) - 4-5 मिली / किलो (क) जैवखते वापर - विशेषतः डाळींसाठी (मूग, उडीद )रिझोबियम किंवा लिफ्टर पी (Phosphate Solubilizing Bacteria) जैवखते वापरणे फायदेशीर. पेरणीच्या आदल्या दिवशी बियाणे थोडेसे ओलसर करून जैवखते लावावीत आणि सावलीत वाळवावीत. (टीप- रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया सोबत करू नये .) 5. पेरणीची वेळ -
1 | तूर | जून दुसरा आठवडा – जुलै दुसरा आठवडा | 2 | मुग | १५ – ३० जून | 3 | उडीद | १५ – ३० जून | 4 | मटकी | जून दुसरा आठवडा – जुलै पहिला आठवडा | 5 | कुलथी | जून दुसरा आठवडा – जुलै पहिला आठवडा | 6 | चवळी | जून दुसरा आठवडा – जुलै पहिला आठवडा |
6. बियाण्याचे प्रमाण -
1 | तूर | १३-१५ / ५-६ किलो/हेक्टर | 2 | मुग | १२-१५ किलो/हेक्टर | 3 | उडीद | १५-२० किलो/हेक्टर | 4 | मटकी | १२-१५ किलो/हेक्टर | 5 | कुलथी | १२-१५ किलो/हेक्टर | 6 | चवळी | १५-२० किलो/हेक्टर | 7. खत व्यवस्थापन – पेरणी किंवा टोकणी करताना- प्रति एकरी बेसल डोस - एन एच -5 – १० किलो
- लिफ्टर व्हॅम गोल्ड – ४ किलो
- कॅच मिक्स एस – १० किलो
- आय मिक्स – ५ किलो
- मुख्य अन्नद्रव्याचा डोस
8. आंतरपीक पद्धती - * तूर + मुग / उडीद / सोयाबीन – १:३ * कापूस + मुग / राजमा – २:१ / २:६ * राजमा + तूर – २:६ * चवळी + तूर – २:१ * कुलथी/मटकी + बाजरी 9. पाणी व्यवस्थापन – योग्य वेळी सिंचन - बहुतेक कडधान्ये पावसावर आधारित घेतली जातात.
- फुलोरा व शेंगा भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
- शेतात पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी.
................................................... मागील लेख - - आयडियल कृषी वाणी 31 - डाळिंब बहारामध्ये मादी कळी सेटिंग
- आयडियल कृषी वाणी 30 - भात पिकासाठी आदर्श सुरुवात
- आयडियल कृषी वाणी 29 - टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस
- आयडियल कृषी वाणी 28 - पपईवर आढळणारे प्रमुख विषाणूजन्य रोग
- आयडियल कृषी वाणी 27 - ऊस पिक बेसल डोस
- आयडियल कृषी वाणी 24 — हळद/ आले (part -1)
- आयडियल कृषी वाणी 20 - आडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?
आयडियल फाउंडेशन 18008330455 शेती उत्पादन विषयी अधिक माहिती मिळण्याकरिता खालील लिंकचा वापर करावा. https://www.facebook.com/share/p/1FPDMjLsSj/
|