आयडियल कृषी वाणी 20 - आडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?
Knowledgebaseआडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?
आडसाली ऊस ही ऊस लागवडीची एक खास पद्धत आहे जी जुलै ते ऑगस्ट या काळात केली जाते. ही लागवड साधारणतः 16 ते 18 महिने जमिनीत ठेवली जाते, त्यामुळे ऊस दोन पावसाळ्यांचा फायदा घेतो. यामुळे इतर ऊस लागवडीपेक्षा जास्त (दीडपट) उत्पादन मिळते. जमिन कशी असावी - • मध्यम ते भारी जमीन (म्हणजे ना खूप रेतीची, ना खूप चिकण माती) • खोली: किमान 60 ते 120 सें.मी. • सेंद्रिय कर्ब (Organic Carbon): 0.5% पेक्षा जास्त चांगली जमीन म्हणजे पोषकतत्व भरपूर असलेली, आणि पाण्याचा निचरा करणारी अशी. कुठल्या जातीचा ऊस निवडायचा - 1. फुले 265 – भरघोस उत्पादन देणारी. 2. को 86032 – रोगप्रतिकारक आणि उत्तम गुळ/साखर देणारी. 3. को व्हीएसआय 9805 – लवकर तयार होणारी व चांगली वाढ. या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी. ऊस लावण्याची पद्धत काय आहे - सऱ्या तयार करणे • मध्यम जमिनीत सऱ्यांचे अंतर 100 ते 120 सें.मी. • भारी जमिनीत सऱ्यांचे अंतर 120 ते 150 सें.मी. *बेणे कसे निवडायचे?* • वय: 9 ते 11 महिन्याचे ऊसाचे बेणे घ्या. • गुणवत्ता: निरोगी, घट्ट व रसरशीत असावे. • नियम: दर 3 वर्षांनी नवीन बेण्याचा स्रोत घ्यावा. दर्जेदार बेण्यामुळे उत्पादन 15-20% अधिक मिळते. ऊस बीजप्रक्रिया - रासायनिक प्रक्रिया* (Chemical Treatment) -
कृती:
*कृती:*
जैविक बीजप्रक्रिया (Biological Seed Treatment) - हे पर्यावरणपूरक व मृदासंवर्धनासाठी उपयुक्त आहे.
*कृती* मिश्र द्रावण तयार करून ऊस त्यात 30 मिनिटे भिजवावा *खत कसे द्यावे?* लावणीपूर्वी बेसल डोस - रोप लागण करण्याआगोदर - • १८:४६:००/१२:३२:१६-१०० किलो • सुपर फॉस्फेट-२०० किलो • एन एच ५ (दानेदार)-१० किलो • एम. ओ. पी.-२५ किलो • लिफ्टर वॅम गोल्ड-८ किलो लावणीच्या वेळी - • नत्र (N): 40 किलो/हेक्टर • स्फुरद (P): 85 किलो/हेक्टर पालाश (K): 85 किलो/हेक्टर लावणीनंतर - 6 ते 8 आठवड्यांनी: 160 किलो नत्र 12 ते 16 आठवड्यांनी: 40 किलो नत्र *आंतरमशागत व तण नियंत्रण* • तण नियंत्रणासाठी कोळपणी/खुरपणी नियमित करा. • सऱ्यांमध्ये नांगरणी किंवा आंतरमशागत करा जेणेकरून माती सैल होते आणि मुळे चांगली वाढतात. तोडणी व उत्पादन - • तोडणी 16 ते 18 महिन्यांनंतर करा. • फुले 265 व को 86032 या जातींचे 200 ते 250 टन/हेक्टर उत्पादन मिळते. आडसाली ऊस लागवड फायदे: - • सुरू ऊसाच्या तुलनेत जास्त उत्पादन • दोन पावसाळ्यांचा फायदा • ऊस भरघोस वाढतो • खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करता येते • तण कमी येते आणि ऊस दाटसर उगमतो. कृषी मार्गदर्शक संपर्क आयडियल फाउंडेशन 18008330455
|