आयडियल कृषी वाणी 24 — हळद/ आले (part -1)
Knowledgebaseहळद/ आले बेसल डोस
आले हळद लागवडीच्या वेळी बेसल डोस (Basal Dose) म्हणजेच पेरणीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळी दिले जाणारे खतांचे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे झाडाला सुरुवातीपासून चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात, तसेच नंतर उत्पादनावर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होतो. बेसल डोसचे महत्त्व – 1. मूळ वाढीला चालना मिळते – बेसल डोसमध्ये दिलेले नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) हे तत्त्व मूळ वाढ, अंकुर फुटणे व सुरुवातीच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. 2. संतुलित पोषण मिळते – सुरुवातीलाच पोषण मिळाल्याने झाड मजबूत बनते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 3. गांठीची योग्य निर्मिती – हळद आणि आले या गांठीव पिकांमध्ये गाठींची योग्य आणि सशक्त निर्मिती होण्यासाठी बेसल डोस फार महत्त्वाचा आहे. 4. मातीतील सुपीकतेचा उपयोग– मातीतील विद्यमान पोषक तत्त्वांचा अधिक चांगला उपयोग बेसल डोसमुळे होतो. 5. खत व्यवस्थापन सोपे होते – नंतरच्या टप्प्यात पूरक खते द्यायचे प्रमाण योग्य प्रकारे नियोजन करता येते. बेसल डोस मध्ये कोणती खते द्यायची? हळद व आलेसाठी सामान्यतः शिफारस केली जाणारी बेसल डोस शिफारशीत * रासायनिक खतांचा बेसल डोस (प्रति एकर) –
*लक्षात ठेवा:* यातील अचूक मात्रा जमिनीच्या मातीपरीक्षणा चाचणीनुसार ठरवाव्यात. *हळदसाठी बेसल डोस (प्रति एकर)* हळद पिकामध्ये लागवड करतेवेळी चा बेसल डोस *लागणीअगोदर 5 दिवस* 1) सिंगल सुपर फॉस्फेट:- १५० किलो 2) एन एच 5 गोल्ड:- १० किलो 3) लिफ्टर व्हॅम गोल्ड:- ४ किलो 4) ऍक्टिव्ह फिप्रो 5 GR: - ५ किलो प्रति एकर सोडावे (आयडीयल फाऊंडेशन) *आल्यासाठी बेसल डोस (प्रति एकर)* लागणीअगोदर 5 दिवस • १८ : ४६ : ००- १०० किलो • अमोनियम सल्फेट- २० ते २५ किलो • एमओपी- १०० किलो • कॅच मिक्स एस- २० किलो • कॅच मॅग एस- २५ किलो • एनएच ५- १० किलो • आय मिक्स- १० किलो • निंबोळी पेंड- १६० किलो • लिफ्टर व्हॅम गोल्ड- ८ किलो • अॅक्टीव फिप्रो जी- ५ किलो • सुपर फॉस्फेट- २०० किलो प्रति एकर सोडावे. ****************************** आयडियल फाउंडेशन 18008330455 शेती विषयक नवनवीन माहिती करिता खालील लिंक द्वारे विविध माहिती तुम्ही प्राप्त करू शकता. https://www.facebook.com/share/p/15k1JzXtpb/?mibextid=oFDknk |