आयडियल कृषी वाणी 46
Knowledgebaseऊस पिकातील हुमणी अळी
|
हुमणी विषयी ओळख - हुमणी ही जमिनीत राहणारी आणि पिकाच्या मुळ्या कुरतडून नुकसान करणारी कीड आहे. विशेषतः ऊस पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाची उगवण, वाढ व उत्पादन यावर गंभीर परिणाम होतो. वेळेवर उपाययोजना न केल्यास ऊस पिकाचे 30% ते 40% पर्यंत नुकसान होऊ शकते. लक्षणे - * उगवलेली उसाची झाडे अचानक सुकणे. * पाने पिवळी होणे आणि वाळणे. * झाडे सहज ओढून बाहेर येणे – मुळे कुरतडलेली दिसतात. * नवीन फुटवे येणे थांबणे. * झाडाच्या मुळांच्या भागात मोठ्या प्रमाणात अळ्या सापडणे हुमणी अळीमुळे होणारे नुकसान - * हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर पडल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा मुळ्यांवर उपजीविका करतात. * दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या जून ते ऑक्टोबर दरम्यान ऊसाच्या मुळ्या कुरतडतात. * मुळे कुरतडल्यामुळे झाड अन्न व पाणी शोषणास असमर्थ ठरते. * त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, पाने मरगळतात व हळूहळू पिवळी पडून झाड सुकते. * एक अळी तीन महिन्यांत तर 2-3 अळ्या एका महिन्यात संपूर्ण ऊस वाळवू शकतात. * होलोट्रॅकिया प्रजातीच्या अळ्यांमुळे उगवणीत 40% व उत्पादनात 15-20 टन पर्यंत नुकसान होते. हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण - उपाय • खोल नांगरणी- एप्रिल-मे मध्ये 2-3 वेळा उभ्या-आडव्या खोल नांगरण्या कराव्यात. • ढेकळे फोडणे- रोटाव्हेटर किंवा कुळवाने ढेकळे फोडावेत. • पीक फेरपालट- प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता भात, सूर्यफूल, भुईमूग, ताग इ. फेरपालटीची पिके घ्यावीत. • सापळा पीक- भुईमूग व ताग हे सापळा पीक म्हणून वापरावेत. • भुंगेरे गोळा करून नष्ट करणे- पावसाळ्यात झाडांवरील भुंगेरे गोळा करून रॉकेल पाण्यात टाकून नष्ट करावेत. रासायनिक नियंत्रण - हुमणी नियंत्रणासाठी प्रति एकर आळवणी 1. अक्टिव्ह मिथो प्रो- 1 लिटर /400 लिटर पाणी 2. एन एच 5 ड्रीप- 1 किलो /400 लिटर पाणी ******************** आयडियल फाउंडेशन 18008330455, 9623121955 शेती विषयक अधिक माहिती मिळण्याकरिता खालील लिमचा वापर करावा. https://www.facebook.com/share/p/1BMSi4Jwvm/ ******************** मागील लेख -
|
