डॉ. संतोष तुपे - संजीवकांची ओळख : ट्रायकॉनटेनॉल
Knowledgebaseसंजीवकांची ओळख : ट्रायकॉनटेनॉल
संजीवकांची ओळख : ट्रायकॉनटेनॉल संजीवके म्हणजे वाढीसाठीचे हार्मोन्स. सर्व वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी सूक्ष्म प्रमाणात विविध जैवरसायने - संजीवके तयार करतात. प्रतिकूल परिस्थितीत किंवा एखाद्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांची योग्य वाढ होत नाही अशा वेळी संजीवकांचा वापर फायदेशीर ठरतो. जिब्रेलिन्स, सायटोकायनिन, ऑक्झिन्स, ट्रायकॉनटेनॉल, ब्रासिनोईड्स हि संजीवकांची काही उदाहरणे. यातील ट्रायकॉनटेनॉल हे एक फॅटी (३० कार्बनची साखळी असलेले) अल्कोहोल आहे. याला मेलिसील अल्कोहोल किंवा मायरिसील अल्कोहोल असेही नाव आहे. वनस्पतीच्या पाना-खोडावरील क्युटिकल या मेणचट आवरणामध्ये हे आढळते. मधमाशीच्या पोळ्यात असणाऱ्या मेणात, लसूणघास, भाताचा कोंडा यामध्ये ट्रायकॉनटेनॉल हे भरपूर प्रमाणात असते. आम्ही भाताच्या कोंड्याच्या मेणापासून ट्रायकॉनटेनॉलची निर्मिती करतो. ट्रायकॉनटेनॉल हे अतिशय प्रभावी संजीवक असून १-५ पीपीएम इतक्या सूक्ष्म प्रमाणात वापरल्यावर पिकावर लक्षणीय परिणाम दिसून येतो. याच्या उत्पादनात मेणातील २४, २६, २८, ३२ कार्बन असलेले फॅटी अल्कोहोलही असतात. फक्त त्यांचे प्रमाण ट्रायकॉनटेनॉलपेक्षा कमी असते. या सर्वांच्या एकत्रित कार्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते आणि फवारणीमुळे पिकामध्ये खालील परिणाम दिसतात - ट्रायकॉनटेनॉल वापरण्याचे फायदे -
ग्रीनव्हेंशन बायोटेकचे ट्रायकॉनटेनॉल शक्तिवान या नावाने उपलब्ध असून सर्व पिकांसाठी १-१.५ मिली/लिटर प्रमाणात वापरल्यावर वरील सर्व परिणामांमुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. मागील लेख - .......................................... डॉ. संतोष तुपे ग्रीनव्हेंशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड .......................................... |