आयडियल कृषी वाणी 67

Knowledgebase
खरीप पिकांमध्ये मर रोग - Wilting

Crop Name : Shared Expenses ||
Work Purpose : Crop Protection ||


मर रोग म्हणजे काय ?
मर रोग म्हणजे पिकाच्या पानांमध्ये ताण निर्माण होऊन पाने, फांद्या किंवा पूर्ण झाड शिथिल होणे, वाळणे, किंवा सुकणे. खरीप हंगामात, विशेषतः पावसाळ्याच्या उष्ण आणि दमट हवामानात वाळवा हा अनेक पिकांमध्ये मोठा नुकसान करणारा आजार आहे.
खरीप हंगामात मर रोग होणारी प्रमुख पिके -
कपाशी
• सोयाबीन
• भुईमूग
• तुर
• मका
• हळद
• आले
• मिरची
• टोमॅटो
• दोडका
• कारली
मर रोग होण्याची प्रमुख कारणे-
सजीव (जंतूजन्य) -
• *बुरशीजन्य आजार* - फ्युजेरियम मर, व्हर्टिसिलियम मर, रूट रॉट (Phytophthora), रिझोक्टोनिया
• *जीवाणूजन्य आजार* - रॅल्स्टोनिया सोलानेसियरम मुळे होणारा बॅक्टेरियल मर
• *सूत्रकृमी (Nematodes)* - मुळे कुजणे
असजीव (गैर-जीवाणूजन्य) -
• पाणी ताण - जास्त पाणी किंवा दुष्काळसदृश परिस्थिती
जमिनीतील मीठाचे प्रमाण किंवा हवाबंदी- पावसामुळे चिखलट जमीन
• अन्नद्रव्यांची कमतरता- विशेषतः पोटॅशियम व कॅल्शियम
विषारी रसायनांचे दुष्परिणाम- कीडनाशकांचे अयोग्य प्रमाण किंवा वेळ
मर रोगाची ओळख – लक्षणे -
• दिवसाच्या वेळेस पाने वाकणे, संध्याकाळी थोडी सुधारणा (प्रारंभिक अवस्था)
• पुरेसे पाणी असूनही झाड वाळलेले दिसणे
• खालच्या पानांपासून पिवळेपणा व वाळणे
• खोडाच्या आत तपकिरी/काळसर रंग (वायस्क्युलर डिसकलरेशन)
• मुळे कुजणे किंवा कुजलेल्या भागातून दुर्गंधी येणे
मर रोगाची व्यवस्थापनाचे उपाय-
• रोगप्रतिकारक वाणांची निवड करा.
• पिक बदल करा
• चांगली निचरा व्यवस्था ठेवा.
• अत्याधिक नत्र खत वापर टाळा, कारण ते झाडाची नाजूक वाढ वाढवते.
*2. रासायनिक नियंत्रण*
*आयलॉक* - 2 लिटर/ एकरी
*वॉश ट्रायसि (tricyclazole)* -500 ग्रॅम/ एकरी
*सीएलओझी-* 1 लिटर ग्रॅम/ एकरी
*3. कृषी पद्धती*
• जमिनीला नेहमी आंबट न ठेवता योग्य पाणी व्यवस्थापन करा.
• रोगट झाडे लगेच उचलून जाळून टाका.
• संतुलित खत व्यवस्थापन ठेवा – विशेषतः पोटॅशियम व कॅल्शियम पूरक द्या.
खरीप विशेष टीप -
खरीप हंगामात दमट हवामान, चिखलट जमीन आणि पावसामुळे बुरशीजन्य व जीवाणूजन्य आजार झपाट्याने पसरतात. सोयाबीन,कपाशी या पिकांत मर रोगचा धोका अधिक असतो, त्यामुळे जमिनीची व मुळांची नियमित तपासणी करा.
आयडियल फाउंडेशन 18008330455
कृषी मार्गदर्शक
संपर्क - 9623121955. 9307304344
शेती उत्पादनाबद्दल अधिक माहिती करिता खालील लिंकचा वापर करावा.