आयडियल कृषी वाणी 68
Knowledgebaseभाजीपाला पिकांतील मर रोग
|
मर हा रोग रोपे लावल्यानंतरच्या सुरुवातीच्या अवस्थेत होतो. विशेषतः टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, भोपळा अशा भाजीपाला पिकांमध्ये तो अधिक प्रमाणात आढळतो. मर रोग मुख्यतः बुरशीमुळे होतो आणि ओलसर, दमट, व कमी निचऱ्याच्या वातावरणात तो झपाट्याने पसरतो. विशेषतः भाजीपाला पिकांची उगमावस्था व ट्रान्सप्लांटेशन नंतरचा कालावधी ही बुरशीसाठी अत्यंत संवेदनशील असते. 1.आर्द्रता (Humidity) -• जास्त वेळ ढगाळ वातावरण असेल, तर रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो. 2. तापमान (Temperature) -• पायथियम spp. तापमान (°C)-20–28°C रोगाची तीव्रता -जास्त • रायझोक्टोनिया solani तापमान (°C)-25–30°C रोगाची तीव्रता -जास्त • फायटॉप्थोरा spp. तापमान (°C)-22–28°C रोगाची तीव्रता- मध्यम ते जास्त • फ्युजेरियम spp. तापमान (°C)-24–32°C रोगाची तीव्रता -मध्यम मध्यम ते उष्ण हवामान आणि ओलसर जमिनीच्या स्थितीत रोग झपाट्याने वाढतो. 3. अति पाऊस / पाण्याचा साच -• सलग २–३ दिवस पाऊस किंवा अतिरिक्त पाणी दिल्यास जमिनीत निचरा होत नाही. • अशा वेळी जमिनीतील ऑक्सिजन कमी होतो, चांगले जिवाणू मरतात आणि रोगकारक बुरशी वाढते. 4. ढगाळ व सूर्यप्रकाशाचा अभाव -• उगम किंवा ट्रान्सप्लांटेशननंतर जर 3–5 दिवस सलग ढगाळ वातावरण राहिले, तर सूर्यप्रकाश मिळत नाही. • अशा परिस्थितीत जमिनीत ओलावा जास्त वेळ राहतो व बुरशी वाढीस चालना मिळते. लक्षणे -1. बी अंकुरताच मर (Pre-emergence damping off) • बी #जमिनीत पेरल्यानंतर ते अंकुरायच्या आधीच कुजते. • बी उगवत नाहीत • जमिनीत बुरशीचा वास किंवा काळसर डाग दिसू शकतात. 2. अंकुरलेल्या रोपांची अचानक मर (Post-emergence damping off) • रोपे जमिनीतून वर येतात, पण काही दिवसांनी अचानक मरतात. • खोडाच्या मुळाशी म्हणजेच जमिनीच्या सपाटीवरची जागा पातळ, पांढरी/तपकिरी *रंगाची किंवा काळसर होते.* • ती जागा कुजून जाते आणि रोप काठावर वाकते किंवा लवकर सुकते. • रोगट रोपे जमिनीवर लोळत पडलेली दिसतात. • रोपांची वाढ थांबते, पाने फिकट होतात किंवा वाळायला लागतात. *डॅम्पिंग-ऑफ कोणत्या अवस्थेत होतो?* • बियाणे पेरल्यानंतर ० ते १५ दिवसांत हा रोग जास्त दिसून येतो. • उष्ण आणि दमट हवामानात याचा प्रादुर्भाव वाढतो. उपाय -1. पाणी साचू देऊ नये • रोपवाटिकेत किंवा शेतात पाणी साचणाऱ्या जागा टाळा. • चांगल्या निचऱ्याची सोय असलेली जमीन निवडा. 2. उंच वाफे तयार करा • नर्सरी तयार करताना १५ सेंमी उंच वाफे तयार करावेत. • यामुळे पाणी साचणार नाही आणि रोग टळेल. 3. अंतर राखून लावणी करा • रोपे खूपच दाट न लावता योग्य अंतर ठेवून लावणी करावी. 4. रासायनिक (Chemical) नियंत्रण *आयलॉक* - 2 लिटर/ एकरी *वॉश ट्रायसि (tricyclazole)* -500 ग्रॅम/ एकरी *सीएलओझी* - 1 लिटर ग्रॅम/ एकरी कृषी मार्गदर्शक संपर्क शेती विषयक माहिती करिता खालील लिंकचा वापर करावा. |
