हळद पिकाची पावसाळ्यातील काळजी
सततचा पाऊस हा नव्याने लागवड केलेल्या हळद पिकासाठी अत्यंत घातक ठरतो. अशा हवामानामुळे जमिनीत सतत ओलावा राहतो, ज्याचा थेट परिणाम रोपांच्या ऊस आरोग्यावर होतो. १. उगवण टप्प्यात रोपांचे कुजणे (Rhizome Rot) - नवीन लागवड झाल्यावर सुरुवातीच्या १०-१५ दिवसांचा काळ हा हळद पिकासाठी अत्यंत नाजूक असतो. या टप्प्यात जर हवामान सतत दमट, थंड व पावसाळी असेल, तर बीजमुळे (rhizomes) कुजण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात वाढतो. सततच्या पावसामुळे काय घडते? - जेव्हा जमीन सतत ओलसर राहते, तेव्हा जमिनीमध्ये हवा (ऑक्सिजन) कमी होते.
- बीज मुळे जमिनीत लांब वेळ राहिल्यामुळे त्यात जीवंतपणा कमी होतो आणि बुरशीजन्य रोगजंतू वाढतात.
- पावसामुळे थेट पाण्याचा संपर्क बीजमुळाशी होतो आणि ते सतत भिजत राहतात.
रोगकारक बुरशी कोणत्या असतात? - पिथियम (Pythium spp)
- फ्यूजेरियम (Fusarium spp)
- रायझोक्टोनिया (Rhizoctonia solani)
या बुरशी जमिनीत नैसर्गिकरीत्या असतात, पण दमट हवामानात त्यांची संख्या अचानक वाढते. लक्षणे (Symptoms) - - बीजमुळे सडलेली, काळसर आणि वास येणारी होतात.
- उगवलेली काही रोपे काही दिवसात वाकतात, कोमेजतात आणि सुकून जातात.
- मुळे आणि खोडाचा खालचा भाग काळसर किंवा पिवळसर रंगाचा होतो – कुजल्यासारखा.
परिणाम - - उगवण दर ५०% पेक्षा खाली जातो.
- शेतात खालचे भाग पाण्याने भरले असल्यास संपूर्ण पट्टा खराब होतो.
- पुढील वाढीवर विपरीत परिणाम होतो – कमी झाडं, कमी मूळ वाढ, वाया गेलेला खर्च.
नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय: - - शेतात पाणी साचणार नाही याची खात्री द्या.
- उंच व भराव असलेली जमीन निवडा.
- लागवड अंतर व पद्धत
- झाडांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी योग्य अंतर ठेवा (30 x 20 से.मी.).
२. डॅम्पिंग-ऑफ \मर रोग - डॅम्पिंग-ऑफ हा रोग नव्याने उगवलेल्या हळद पिकात सतत ओलसर, दमट आणि थंड हवामानात वेगाने पसरतो. सतत पावसामुळे किंवा अतिरिक्त पाण्यामुळे हा रोग विशेषतः उगवल्यानंतर १०-२५ दिवसांच्या कालावधीत दिसून येतो. डॅम्पिंग-ऑफ रोग का होतो? - सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचते, जमीन ओली राहते.
- या परिस्थितीत जमिनीतील हानिकारक बुरशी वाढते.
- ही बुरशी रोपाच्या मुळाशी आणि खोडाच्या तळाशी हल्ला करते.
- ऑक्सिजनचा अभाव आणि तापमान २०-३०°C मध्ये असेल तर हा रोग अधिक तीव्र होतो.
लक्षणे (Symptoms) - 1. उगवायच्या आधी डॅम्पिंग-ऑफ (Pre-emergence damping-off) - बीजमुळे उगवायच्या आधीच कुजतात.
- उगवण होत नाही, शेतात रिकामे पट्टे दिसतात.
2. उगवल्यानंतर डॅम्पिंग-ऑफ (Post-emergence damping-off) - रोप उगवले तरी काही दिवसात खोडाच्या तळाशी पातळ काळपट वळ दिसते.
- रोप आडवे पडते, वाळते आणि मरते.
- मुळे कुजलेली व मऊ होतात.
परिणाम - - पेरणीखालील बीजमुळे वाया जातात.
- झाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.
- उत्पादनात ३०-५०% पर्यंत घट येते.
- उर्वरित झाडे कमकुवत व बारीक राहतात.
नियंत्रण व प्रतिबंधक उपाय - जमीन व्यवस्थापन - उंच व उतारावर लागवड करावी जेणेकरून पाणी साचणार नाही.
- शेतात योग्य ड्रेनेज (वाहते पाणी) ठेवणे आवश्यक.
रासायनिक नियंत्रण (Chemical Control) - - सीएलओझी रिएजंट 1 (1लिटर)+ सीएलओझी रिएजंट 2 (1लिटर)/200 लिटर पाणी प्रति एकरी ड्रीप मधून देणे.
- आयलॉक 1 लिटर + कॅप्टन 500 ग्रॅम/400 लिटर पाणी प्रति एकरी ड्रीप मधून देणे.
***** आयडियल फाउंडेशन ***** 18008330455, 9623121955 शेती विषयक पिकाची अधिक माहिती करिता खालील लिंकचा वापर करावा https://www.facebook.com/share/p/16qReESY1t/ *************
|