डॉ. संतोष तुपे - दही आणि यीस्टचा शेतात वापर -स्वस्त आणि मस्त
Knowledgebaseदही आणि यीस्टचा शेतात वापर -स्वस्त आणि मस्त
दही आणि यीस्टचा शेतात वापर (स्वस्त आणि मस्त)दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया (LAB) नावाचे जिवाणू असतात. असिडोफिलस, बल्गारिकस, केसी, डेलब्रुकी, प्लांटारम या LAB च्या उपजाती आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस, बायफिडोबॅक्टरीयम हे जिवाणू दुधाचे किण्वन करून दही बनवतात. दह्याचा शेतात वापर केल्यामुळे फायदे -
यीस्ट (सॅकॅरोमायसिज सेरेव्हिसीये) किंवा बेकर्स यीस्ट - याचा मुख्य वापर हा बेकरीत पाव बनवण्यासाठी तसेच द्राक्षापासून वाईन तयार करण्यासाठी केला जातो. यीस्टचा शेतात वापर केल्यामुळे फायदे -
दही आणि यीस्टचा शेतात वापर कसा करावा - EM (Effective Microbes) culture वर आधारित उत्पादनात असेल्या तीनपैकी हे वरील दोन सूक्ष्मजीव आहेत. दही आपण घरी बनवतो, तर बेकर्स यीस्ट बेकरीवाल्याकडे मिळेल. अर्धा किलोचा चौकोनी आकाराचा गोळा ५० ते ७५ रुपयात मिळतो. बेकरीत नाही मिळाले तर दुकानात ड्राय यीस्ट मिळते जे पाण्यात टाकल्यावर ऍक्टिव्ह होते. दह्यामध्ये १०^९ पर्यंत LAB असतात, तर यीस्टच्या एका ग्राम मध्ये १०^१२ पर्यंत काउन्ट असतो. महिन्यातून एकदा १ किलो दही आणि अर्धा किलो यीस्ट पाटपाण्यातून, ड्रिपमधून सोडले तर पिकाला चांगला फायदा होईल. ............................................... डॉ. संतोष तुपे ग्रीनव्हेंशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ............................................... |