ऊस संजीवनी - कृषिभुषण डॉ संजीव माने, आष्टा
Knowledgebaseआडसाली ऊस पिक व्यवस्थापन
ऊस संजीवनी कृषिरत्न, कृषिभुषण डॉ संजीव माने, आष्टा ------------------------------ नमस्कार. हा चार्ट मी माझ्या शेतीत वापरत आहे. आपल्या माहीती साठी पाठवीत आहे जुलै महीना म्हणजे आडसाली लागणीचा हंगाम. 15 जुलै ते 15 ऑगष्ट.आडसालीची पुर्व तयारी पुर्वी पाठवलेल्या माहीती नुसार केलेली असणार आहेच. ऊस पीकासाठी वर्षभर काय काय नियोजन करावयाचे याचा एक चार्ट पाठवित आहे. हा सेव करुन ठेवावा, वेळो वेळी पहावे. पूर्व मशागत / पूर्व तयारी - 1. पाचट कुटटी करुन गाढावी. 2. रोटर मारुन नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी. 3. सेंद्रीय खतांचा मुबलक वापर करावा. शेणखत 20 टन किंवा कंपोस्टखत 15 टन , हिरवळीचे खत , गांडुळ खत इत्यादिं द्यावेत . 4. ढेकळे फोडुन बारीक करुन घेऊन सरी काढावी. 5. सरी मध्ये थोडेसे सेंद्रीय खत पसरुन घ्यावे. शक्य असलेस कारखान्याची काळी राख 800 - 900 किलो पसरुन घ्यावे. 6. सरी मध्ये सेंद्रीय खतावर रासा खते - बेसल डोस टाकुन हलक्याश्या अवजाराने सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे. मातीत मिसळुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 7. सरीची रुंदी - मध्यम व हलक्या जमीनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमीनीत पाच फुट रुंदीची सरी काढावी. पॉवर टिलरने भरणी/खांदणी उत्तम होते. आणि सहा फुटी सरी काढली तर चार चाकी लहान ट्रॅक्टरने भरणी होते. 8. बियाणातील अंतर - मध्यम व हलक्या जमीनीत एक डोळा दीड फुटावर व मध्यम व खोल काळ्या जमीनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे. 9. तण नाशक - लागणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जमीनीत ओल असताना मेट्रीब्युझिन ची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे. 10. बेसल डोस - (लागण करणेपूर्वी सरीमध्ये खते टाकून मातीत मिसळून घ्यावे) अ. डी ए पी 100 किलो ब. पोटॅश 75 किलो (वरील अ आणि ब ऐवजी 9,24,24, 4 बॅग किंवा 10,26,26 4 बॅग घ्याव्यात) क. सुक्ष्म अन्न द्रव्ये 15 किलो (मिश्रण प्रमाण शेवटी दिले आहे) ड. गंधक 15 किलो ई. मॅग्ने सल्फेट 25 किलो फ. किटक नाशक 6 किलो (फरटेरा) बीज प्रक्रिया - बियाण्यावर बुरशीनाशक व किटक नाशकाची प्रक्रीया करुनच लागण करावी. बुरशीनाशक १ ग्रॅम,किटक नाशक १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळावे आणि बियाणे दहा ते पंधरा मिनीटे बुडवावे. लागण करणे - पुर्वी सरीत पाणी देऊन जमीन ओलावुन घ्यावी. कोरड्यात लागण करुन लगेचच पाणी द्यावे. किंवा पाण्यात लागण करावी. प्रती 10 टिपरे/कांड्या/ बियाणे लावून तिथे 2 टिपरे जादाचे लावावेत. म्हणजे तूट आळी भरून काढन्यास त्याचा उपयोग होतो. आळवणी - लागणीनंतर सहा सात दिवसात हलकेसे पाणी द्यावे. वापश्यावर आळवणी करावी पांढऱ्या मुळ्यांची वाढ भरपुर आणि जोमाने होते, फुटवे एकसारखे, जोमदार व योग्य प्रमाणात मिळतात, प्राथमिक वाढ चांगली होते, खतांचे शोषण चांगले होते. A) रोप लावणी नंतर 2-4 दिवसानी किंवा कांडी लावणी नंतर 6-8 दिवसानी - जमीनीत ओल असताना आळवणी करावी. 1) 12:61:00 - 1 किलो 2) ब्लॅक बॉक्स 1 3) बुरशी नाशक 400 ग्रॅम 4) किड नाशक 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी . B) जिवाणु - लागणी पासुन 10 व्या दिवशी अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर क. ट्रायकोडर्मा 1 लिटर ड . पोटॅश ॲक्टिवेटर. 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळुन जमीनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातुन सोडावे. ड्रिप असेल तर त्यातुन सोडावे. ऊस संजीवणी फवारणी - फवारणी क्रमांक 1 - लागणी पासुन 45 व्या दिवशी पहिली फवारणी ( 60 लिटर पाणी पुरते ) या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे. फवारणी क्रमांक 2 - लागणी पासुन 65 व्या दिवशी दूसरी फवारणी ( 90 लिटर पाणी पुरते ) या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक घ्यायचे आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे. फवारणी क्रमांक 3 - लागणी पासुन 85 व्या दिवशी तीसरी फवारणी ( 135 लिटर पाणी पुरते ) या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक घ्यायचे आहे. याच दरम्यान उसाची जोरदार वाढ होत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे. फवारणी क्रमांक 4 - लागणी पासुन 105 व्या दिवशी चौथी फवारणी ( 150 लिटर पाणी पुरते ) ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते. फवारणी क्रमांक 5 - लागणी पासुन 125 व्या दिवशी पाचवी फवारणी (शक्य झालेस) ( 180 लिटर पाणी पुरते ) रासायनिक खते डोस - डोस क्रमांक 1 - बेसल डोस लावण करताना देणे डोस क्रमांक 2 - लागणी पासुन 20/25 दिवसानी अ. युरीया 45 किलो सरीत टाकावे. डोस क्रमांक 3 - लागणी पासुन 40/45 दिवसानी अ. युरीया 90 किलो सरीत टाकावे. डोस क्रमांक 4 - लागणी पासुन 60/65 दिवसानी बाळ भरणी अ. युरीया 45 किलो ब. 9,24,24 100 किलो क. पोटॅश 0 किलो ब. लिंबोळी पेंड 10 किलो मिसळुन पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीचे छिद्र घ्यावे आणि दोन छिद्रातील अंतर एक फुट घ्यावे त्यात खते घालुन मुजवुन घ्यावे. डोस क्रमांक 5 - लागणी पासुन 90 ते 120दिवसानी शक्य असतील तसे सेंद्रिय खताचा वापर करावा. अ. युरीया 135 किलो ब. डी ए पी. 50 किलो क. सिं सु फॉस्फेट 150 किलो (ब आणि क ऐवजी डिएपी 100 किलो किंवा 9,24,24 4 बॅग किंवा 10,26,26 4 बॅग) ड. पोटॅश 100 किलो ई. लिंबोळी पेंड 100 किलो उ. सु अ द्रव्ये 15 किलो ए. गंधक 15 किलो ऐ. मॅग्ने सल्फेट 25 किलो ओ. कीटक नाशक 8 किलो फरटेरा सोबत सेंद्रिय खत टाकून भरणी/खांदणी पुर्ण करावी. जिवाणु - भरणी पासुन 10 व्या दिवशी अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर क. पोटॅश के एम बी 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळुन जमीनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातुन सोडावे. ड्रिप असेल तर त्यातुन सोडावे. डोस क्रमांक 6 - भरणी पासुन 30 दिवसानी अ. अमो सल्फेट 50 किलो ब. 9,24,24 00 किलो क. पोटॅश 25 किलो ब. लिंबोळी पेंड 00 किलो मिसळुन सरीत टाकावे. डोस क्रमांक 7 - भरणी पासुन 60 दिवसानी अ. ॲमो सल्फेट 25 किलो ब. 9,24,24 40 किलो सरीत टाकावे महत्वाचे - 💥 कॅलशियम नायट्रेट 10 किलो आणि बोरॉन20% चे 1 किलो मोठ्या भरणी नंतर 15 दिवसानी स्वतंत्रपणे सोडावे. 💥 नंतर 15 - 15 दिवसाचे अंतराने कॅलशियम नायट्रेट 5 - 5 किलो तीन चार वेळा स्वतंत्र द्यावे . महत्वाचे - 💥 सुक्ष्म अन्न द्रव्ये देण्या पुर्वी माती परीक्षण करुन कोणते सुक्षम अन्न द्रव्ये कमी किंवा जास्त आहेत ते पहावेत. 💥 खालील प्रमाणे सुक्ष्म अन्न द्रव्याचे नियोजन केल्यास ऊस उत्पादन वाढिस फारच उपयुक्त ठरते. अ. फेरस सल्फेट - 10 किलो ब. झिंक सल्फेट - 10 किलो क. कॉपर सल्फेट - 0.5 किलो ड. मॅंगेनिज सल्फेट - 5 किलो इ. बोरॉन 20% - 1 किलो असे मिश्रण तयार करुन 25/50 किलो शेणखतात 10/15 दिवस मुरवत ठेवून दिलेस यांची उपयुक्तता फारच वाढते. 🔴 संजीवकांच्या फवारणीचा तक्ता हा डॉ बाळकृष्ण जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे . 💥फवारणी बाबत किंवा संजीवके उपलब्धते बाबत माहीती हवी असलेस सम्पर्क साधावा💥 🔴 Ajinkyadada - 9403964040 ऊस संजीवनी स्टॉक पॉईंट गेली 12 वर्षे कार्यरत आहे वरील प्रमाणे आणि शास्त्र समजुन जर प्रयत्न केले तर एकरी 100 टनच काय तर माझ्या इकडे "एकरी 151" टनाचा प्रयोगही यशस्वी झालेत. वरील चार्ट हा मार्गदर्शक पर आहे. साधारण पणे केंव्हा काय करावे लागते त्याची पुर्व तयारी असावी म्हणुन सर्व एकत्रीत चार्ट दिला आहे. कोणत्याही परीस्थितीत लागणी पासुनचे दिवस चुकवु नका. वेळच्या वेळी बाबी पुर्ण झाल्या की उत्पादनात भरीव वाढ मिळते. फवारणी मध्ये संजीवकांचा वापर केल्याने अधिकचे उत्पादन सहजासहजी मिळते. गृपच्या सदस्यासाठी उत्तम कॉलिटीचे आणि अत्यंत माफक कॉंट्रीब्युशन कॉस्टमध्ये #संजीवके जिवाणु घर पोहोच# वितरीत केली जातात. 🔴 संपर्क Ajinkyadada 9403964040 *.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.* कृषिरत्न संजीव माने 9404367518 अजिंक्य माने 9403964040 ऊस संजीवनी *.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.*.* गुजरात येथे 500 एकर वर कृषिरत्न संजीव माने दादांच्या मार्गदर्शना खाली सुरू असलेल्या 100 मे टन ऊस उत्पादन प्रकल्पाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा (2017-18) |
Post Shared with following groups | |||
---|---|---|---|
Group Name | Options | ||
Test group Grapes 2025 | |||
खोडवा व्यवस्थापन |