खरीप मका व्यवस्थापन - शिवश्री रमेश खंडागळे

News
खरीप मका व्यवस्थापन - 2025

Crop Name : Maize ||
Work Purpose : Shared Expenses ||


अग्रण धुळगांव (ता. कवठेमहांकाळ) चे प्रगतशील युवा शेतकरी रमेश खंडागळे यांनी मका पिकाचे एकरी ७१ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी 71 क्विंटल उत्पादन घेताना खालील प्रमाणे मका पिकाचे व्यवस्थापन केले होते.

  • जमिनीची पूर्व मशागत - खोलवर नांगरणी, दोनदा कुळवणी, रोटावेटर, बैलाच्या मदतीने दोन फुटावर सरी पाडली.
  • बियाणे - राशी ३४९९, एकरी ८ किलो बियाणे
  • बीज प्रक्रिया - प्रति किलो बियाण्यास गाऊचो ३ ml (कीटकनाशक), २५ gm ट्रायकोडर्मा, अझोटोबँक्टर + PSB (जिवाणू संवर्धन), १०० ग्रॅम गूळ.
  • लागवड पध्दत - मजुरांच्या सहाय्याने ६० x २० cm वर टोकण.
  • खते - माती परीक्षण करून रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. हेक्टरी १७ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत, २ टन गांढूळ खत, 10.26.26/ DAP/ 9.24.24 (१०० किलो), झिंक सल्फेट (१० किलो), युरिया (३ किलो), सूक्ष्म अन्नद्रव्ये (१० किलो), निंबोळी पेंड (१०0 किलो)
  •  कीडनियंत्रण - एकरी ९ कामगंध सापळे व २५ पिवळे निळे चिकट सापळे लावले. तसेच ५ % निंबोळी अर्क, Proclaim, BT, हमला , दशपर्णी अर्क यांचा वेळोवेळी वापर केला.
  •  आंतरमशागत - कोळप्याच्या ३ पाळ्या दिल्या व मका बैलाच्या साहाय्याने बांधून घेतली.
  • उत्पादन - साध्य केलेली उत्पादकता १७७.५९० quintal /हेक्टर 
  • मका संदर्भात महत्वपूर्ण विडिओ माहिती - 

1. मका पिकासाठी रासायनिक खत व्यवस्थापन - बेसल डोस

2. मका पिकाची लागवड करत असताना बीज प्रक्रिया करणे काळाची गरज

3. मका तणनाशक फवारणी

4. मका लागवड करण्यास प्रारंभ केला


श्री संभाजी तातोबा खंडागळे.

अग्रण धुळगांव (ता. कवठेमहांकाळ, जिल्हा - सांगली)

फोन नंबर - 9096261295